कॉफी हौस ( कॉफी हाउस )

Started by sanjay somade, April 26, 2012, 01:26:31 PM

Previous topic - Next topic

sanjay somade

कडवट घोटात एका सौभाग्याचा बळी गेला
कळणार नाही केव्हां कॉफीचा भरला पेला 

औदार्याने त्याच्या,आसमंत शून्य झाला
सौंदर्याने माझ्याच बुद्धीचाही घात केला

भाजल्या कॉफीबियांचा  कार्बन चविष्ट झाला
घरच्या जुन्या कपाचा मला वीट का ग आला?

वाफाळलेल्या मगाची गोडी अवीट न्यारी
कोल्ड कॉफीच्या थंडाईत रुतली  रीत-भात सारी

कान तुटक्या कपाचा स्वाद जुना झाला
भरल्या संसारास  माझ्या  स्वाद कॉफीचा आला

आता सवयींचे झाले मदन मज सारे
आज नव्याने कुणीतरी माझे दार ठोठवा रे
                                                  ---भरत सोमदे

Deepak Pardhe