इटुकला आंगण पिटुकला नंदनवन

Started by kumudini, April 26, 2012, 05:26:15 PM

Previous topic - Next topic

kumudini

इटुकला आंगण पिटुकला नंदनवन

आज माझ्या अंगणाला रंग गुलाबी चा आला
आभाळात बालरवी आहे का ग उगवला
आंगणात सदा आज सुगंधाने शिम्पेयाला
जाई जुई ने भार त्यांचा हलकागा केला
चांदण्यात श्री रंग रंग राधे सवे खेळयेयला
पाहुनिया गुलाला का जास्वंद उधळला
सन माझ्या अंगणात मोगरा हा फुललेला
राधेचा  गजरा हा आहे बी विखुरला
खेळ खेळता कान्हाने खोडी राधेची काढली
वेणी ती फुलेसरी चमेलीची कि ग झाली
आजू माझ्या आंगणात अमृताची बरसात
रजनीचा नाथ तेथे विराजत
आंगण हे इतुकले नंदनवन पिटुकले
                                                                  कुमुदिनी कालीकर 

केदार मेहेंदळे