बाबा माझे एक मागणे आहे ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, April 27, 2012, 11:37:18 AM

Previous topic - Next topic
"एका छोट्या मुलीची विनवणी आहे माझ्या शब्दांत मी उतरवतो आहे ...
प्रत्येक मुलीला जीव लावणाऱ्या त्या वडिलाकरिता आहे ...."
बाबा माझे एक मागणे आहे
मला जगायचे आहे तुमच्या संग
किती केलेस माझ्यासाठी तू
वाहिलेस किती इच्छापूर्तीचे ओझे
नको ना दूर करूस
मला जगायचे तुमच्या संग ....

ऐकू नाही येत रे मला देवानेच दगा दिला
जन्म मी घेतला हा नाचता ना माझाच गुन्हा
मी आली बाबा मला तुझे प्रेम हवे होते
आयुष्य जगायला एक सावली पाहिजे होते ....

तूच माझे दैव आणि तूच बालपण
संपऊ नको रे ते दिवस जे मी तुझ्या छायेत घालवले
दुसर्याच्या हातात हात देऊन नको रे असे दूर करूस
मला दूर करून तू एकता नको ना पडूस
राहू देणा बाबा मला तुझ्यासोबतच राहू दे....

तुझ्या डोळ्यांत राहून मला सारे विश्व पाहू दे
नको त्या डोळ्यांत माझ्यासाठी पाणी
वेगळे असे करून नको ना संपऊ
बाप लेकीची छोटीशी पण जीवाची हि कहाणी ....

बाबा माझे एक मागणे आहे
मला जगायचे आहे तुमच्या संग....
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆