...काय अर्थ आहे?

Started by vaibhav joshi, April 27, 2012, 11:49:59 AM

Previous topic - Next topic

vaibhav joshi

जीवनरूपी झऱ्यातलं पाणी

झिरपत झिरपत जाऊन कालांतराने कमी होतं

असं म्हणण्यात काय अर्थ आहे ?

- या झिरपणाऱ्या पाण्यामुळेच रुजवलेलं पीक 'सुपीक' होतं

असं समजायला काय हरकत आहे?

आपल्या नशिबात हे नाहीच

असं म्हणून निराशा पदरी पडून घेण्यात काय अर्थ आहे?

  - आकाशाकडे बघत चाललो होतो म्हणून ठेच लागून पडलो

असं समजायला काय हरकत आहे?

आम्ही तुमच्यासारखे 'अमुक' असतो

तर 'तमुक' करून दाखवले असते

असं म्हणण्यात काय अर्थ आहे?

- आपण तसे ''अमुक'' नव्हतो म्हणूनच

आपल्या जीवनातली ''चुकामुक'' टळली

असं समजायला काय हरकत आहे?

--- वैभव वसंत जोशी, अकोला 


केदार मेहेंदळे