मला कळतंय ! (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, April 27, 2012, 02:40:13 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


मला कळतंय !

मला कळतंय
तिचं मन वळतयं
मला कळतंय
तिचं मन वळतयं

फार बडबड करणारी ती
माझ्याशी बोलतांना अडखळते
थोडा वेळ शांत राहून
मग हळूच बोलण्याचा प्रयत्न करते
तरीही सुचलेलं सांगतांना
कुठे काही तरी राहतंय

मला कळतंय
तिचं मन वळतयं
मला कळतंय
तिचं मन वळतयं

तिची माझी भेट होऊन
चार दिवसांची मैत्री झाली
कालच्या दिवशी न आवडणारी
भेंडीची भाजी तिने कशी खाल्ली ?
मला वाटतं माझ्या आवडीशी
तिचं नातं जुळतंय

मला कळतंय
तिचं मन वळतयं
मला कळतंय
तिचं मन वळतयं

नेहमी रडका तिचा चेहरा
मला पाहताच हसरा होतो
मैत्रिणीच्या आडोशी राहून
मला निरीक्षिता आनंद होतो
जणू तिचं संपूर्ण भान
माझ्यामाध्येच  हरपतंय

मला कळतंय
तिचं मन वळतयं
मला कळतंय
तिचं मन वळतयं

कवी - कल्पेश देवरे







Kalpesh Deore