उधारीचं जगणं!!!

Started by dinesh.belsare, June 18, 2026, 09:26:05 PM

Previous topic - Next topic

dinesh.belsare

उधारीचं जगणं!!!

शरीर उधार, श्वास उधार,
क्षणोक्षणी विचारांचा प्रवाहही उधार।

शब्द उधार, कृती उधार,
तनी-मनी भक्तीपूजेचा प्रचारही उधार।

चक्षू उधार, दृष्टी उधार,
दिसणाऱ्या अन् दाखवणाऱ्याचा प्रकाशही उधार।

जीवन उधार, मृत्यू उधार,
प्रत्येक श्वासाचा प्रवासही उधार।

माझे उधार, ना-माझे उधार,
"मी माझे, तू तुझे" यांचा भास अन् भ्रमही उधार।

नाम उधार, रूप उधार,
जन्म-मरणाचा सारा व्यापार उधार।

जेव्हा विरते 'मीपणाचा' आधार,
तेव्हा कळते—सारेच उधार॥**