आई मला मोठं व्हायचंय गं . . .

Started by Deepak Pardhe, April 27, 2012, 04:07:43 PM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe


(प्रथमत मी आपली शमा मागतो, कि खालील कविता हि "आई" वर लिहिलेली आहे आणि हि कविता मी 'प्रेम' ह्या सदरात मांडत आहे . . .
त्याला कारण असे कि . . . आपल्यापैकी बहुतेकजन फक्त ह्याच सदरातील कविता वाचतात . . .
त्यामुळे मला असे वाटते . . . इतर सदरातील कवितांवर अन्याय होतो आणि त्यांना हवी तशी दाद मिळत नाही . . .
मला माहित आहे कोणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . . . पण काय असते . . .
कवी म्हणजे एक असा व्यक्ती असतो ज्याला सतत वाटत असते कि आपण केलेल्या कवितेला सतत दाद मिळत राहावी . . .
आणि हे स्वाभाविकच आहे . . . तसाच मी हि एक नवीन कवी आहे . . . तर मलाही वाटते कि माझ्या सगळ्या कविता तुमच्या पर्यंत पोहोचाव्यात . . . 
आणि त्यावर सतत तुमच्या प्रतिक्रिया मिळत राहाव्यात . . . कोणाला काही ह्यावर सल्ला द्यायचा असेल तर ते देवू शकतात . . . )



झुकवून आभाळ सारं, गगणात नाचायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

रांगत रांगत पुढे तुझा हात धरला गं,
प्रत्येक पाऊलाला तुझा संस्कार लाभला गं,
कर्तव्याचे फुल तुझ्या चरणी वहायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

शाळेत शिकताना, तुझे स्वप्नं जाणले गं,
शिकवावे मला खुप, असे तू ठाणले गं,
शिकुन मिळवलेली कला, मला जगाला दाखवायचीयं गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

संकटकाळी माझ्या, फक्त आधार तुझा भेटला गं,
तुझ्या रुपात, देवचं पाठीशी उभा राहिला गं,
न घाबरून प्रसंगाला फक्त पुढेच जायचंय गं,
स्वप्नांना कवेत घेऊन,  आई मला मोठं व्हायचंय गं . . .

आता नाही थांबणार कुठे, हा निश्चय केलाय गं,
आली संकटे लाख, त्यांना धुळीत मिळवणार गं,
केलेल्या त्यागाचे तुझ्या, मी सार्थक करणार गं,
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . .
स्वप्नांना कवेत घेऊन आई मी नक्की मोठा होणार गं . . .


- दीपक पारधे

jyoti salunkhe

Khup Sundar kavita aahe deepak .... :)   aani aai hya vishyavar lihileli pratek kavita hi sunder asnarach karan aai hach kiti sunder shabd aahe.

Deepak Pardhe


धन्यवाद ज्योती . . . 

कवितेपुरते नाही, पण खरच आई म्हणजे असे व्यक्तिमत्व . . .
जिच्याशिवाय जगातील कुठलीही व्यक्ती श्रीमंत म्हणून जगू शकत नाही . . .
माणसाला जितकी गरज जोडीदाराची असते . . . मी म्हणेन तितकीच गरज आईची असते . . .
पण म्हणतात ना . . . ज्याच्याकडे असते त्याला काळात नाही आणि ज्याच्याकडे नसते . . . तो कितीही जेवला तरी उपाशीच असतो . . .

Nagesh kale

खुपच छान दिपक मला आवडली तुझी कविता. म्हणतात ना  स्वामी 3नी जगाचा आई विना भिकारी.

MobiTalk9

Khup Sundar Ahe... Deepak Mi hi Kavita Majya Facebbok Chya Fanpage war Post Karu Shakato ka?

http://www.facebook.com/Aaichagho

ya page war


Deepak Pardhe


Thanks Prashant and Nagesh .... thanks for commenting....

@mobitalk9 : yes of course kar... nakki aawadel mala... majhi kavita spread zali tar...

Priya Tambadkar


PINKY BOBADE


Deepak Pardhe