पहाटेचे स्वप्न...

Started by Rupesh Naik, April 27, 2012, 05:29:51 PM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

पहाटेचे स्वप्न...
               --- रुपेश नाईक
ती सकाळ जरा जास्तच ताजी होती
कारण पहाटेच्या स्वप्नात ती माझी होती

साहजिकच माझा मुड होता चांगला
शब्दांना देखील सूर होता गवसला

विनासायास ओठांवर ते सुरेल गाणे रेंगाळले
मन तर भरकटले वर देहभान हि हरपले

नजरेला ओढ होती तिच्या एका भेटीची
माझ्या प्रेमाच्या पणतीला गरज होती एका वातीची

दुरूनच तिची मग पाठ्मोरी पहिली आकृती
काळजावर आली दुर्दशा हृदयाची झाली विकृती

गालावरच्या लटा तिला त्रास देत होत्या
माझ्या हळव्या मनावर नाजूक वार करत होत्या

एक लट सावरत तिने स्मित हास्य साधले
माझ्या बिकट मानसिक प्रकृतीला ते बाधले

तिची देखील आज काळी होती उमलली
पडद्याआड मी आमुची जोडी होती जमवली

सर्व 'DHAYRYA' एकवटून तिला पहाटेचा प्रसंग सांगितला
एका गुढग्यावर बसून मग हाथ लग्नासाठी मागितला

ती पहिले थबकली नंतर थोडीशी लाजली...
शुभमुहूर्तावर आमुच्या लग्नाची शहनाई वाजली

प्रत्येक सकाळ आता कशी ताजी ताजी असते
कारण पलंगावर शेजारी प्रेयसी माझी असते..... ;)


sudam dandegaonkar


bhanudas waskar

सुंदर ............खुपच
*
*
*
*
*
*
*
मनाला लागली


*****भानुदास*****  

balasaheb

आली चालत समोर
थेब थेब पावसात
साडी नेसून सुंदर
पाहून तिचे रूप
झाले मनात धड धड

:- बाळासाहेब जाधव

Isha Gorivale



dipjamane


Dhiraj kadam

Wa kavita vachatana far maja aali.
Apratim!