अपरिहार्य

Started by शिवाजी सांगळे, June 19, 2026, 09:09:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अपरिहार्य

शोधण्यात मुर्त अमूर्त आयुष्य सरले
भ्रमच फक्त ते, आपले होऊन नुरले

करता मी, माझं, मला जन्म सरला
वळून पाहता माघारी रितेपण उरले

आकार निराकारात भास हे जगाचे
जाणण्या अस्तित्व, जीवन रे सरले

व्हावे सावध, वेळीच वाटले कैकदा
ऐहिकाने आहे ना, जीवन हे भारले

कळले हो, कष्ट जीवाचे शिवा म्हणे
अपरिहार्य तरी भोगणे अजूनी उरले

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९