वाट

Started by प्रशांत नागरगोजे, April 28, 2012, 07:50:44 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

वाट चालायची किती, पावलं झिजली,
बांध फोडून डोळ्यांची, अश्रू दाटली.
प्रत्येकाची प्रत्येक आठवण, हृदयात झिरपली,
त्याच ओलाव्याची मनास, खरी ठेच लागली.
तरी काही स्वप्ने ,डोळ्यांत सजविली,
सावलीच्या साथीनं, जीवनावर  वाट कोरली.
होऊनी चातक, येणाऱ्याची वाट पहिली,
तरी नाही झळकली दुरूनही, कोणाची सावली.
श्वास होता जिवंत म्हणून, जिद्द एकटवली,
एक सावलीसाठी सावलीनं, अजून वाट सजवली.
एक वळणावर समजलं, आयुष्याची गणितचं चुकली,
मंजिल भेटलीच नाही, श्वासांनीच झोप घेतली.
श्वासांना उठवायला, सावलीनं पावलं उचलली,
पण तेव्हांच नकळत, जिद्दीनं साथ सोडली.

for image visit www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे


प्रशांत नागरगोजे

Dhanyawad kedarji...

PINKY BOBADE

Atishay Sundar..................