माणुसकीचा गंध

Started by muktibodh, April 29, 2012, 08:15:01 PM

Previous topic - Next topic

muktibodh

 या घरात फ़ार पुर्वी
चॆतन्याचे झरे होते,
या घरात एके काळी
सळसळणारे जीवन होते!

या घरात भविष्याचा
वेध घेणारे स्वप्न होते,
या घरात माणुसकीला
जपणारे जीव होते!

आता येथे शुकशुकाट
काळोखाची दीर्घ लाट,
निर्जिव ओल्या भितींवरती
भेसुर आकृत्यांचे महाजाल!


अजून देखिल या वास्तूत
तळमळणारे जीव आहेत,
अंधारात लुकलुकणारे
चार डोळे अजुन आहेत!

बाहेर म्हणतात प्रकाश आहे
स्वच्छ निर्मळ हवा आहे,
हिरव्यागार वस्त्रांनी
बहरलेले धरा आहे!

प्रकाशावर झडप घालून,
अनेक पतंग वाया गेले,
शुध्द हवेत श्वास घेउन
कित्तेक जण गुदमरुन मेले!

निदान या काळोखात
हक्काची झोप येते,
सुंदर मोहक स्वप्नांची
थोडी तरी साथ होते!

अजून ह्या वास्तुला
माणूसकीचा गंध आहे,
कितीही जीर्ण असली,
तरी तीच एक आशा आहे!

प्रदीप मुक्तिबोध

shashaank

अजून ह्या वास्तुला
माणूसकीचा गंध आहे,
कितीही जीर्ण असली,
तरी तीच एक आशा आहे!>>>>> chaan olee aahet yaa......

केदार मेहेंदळे