परदेशस्थाचं मनोगत

Started by madhura, May 01, 2012, 08:42:16 PM

Previous topic - Next topic

madhura




गांव सोडुनी शहरी आलो
झालो केवळ अन पोटार्थी
परंतु जेव्हा देश बदलला
होउ लागली इच्छापूर्ती

का नाकारु? इथे लाभली
आयुष्याला अवीट गोडी
स्थावरता अन सुरक्षितता
साचत गेली...थोडी...थोडी...

भले आठवे घाट भंगला
...आणि वांत ती माजघरातिल
परंतु वाटे बरी स्वच्छता
शरिरांची अन मनामनांतील

सण थोडे अन थोडे उत्सव
सदैव परके... हे ही वास्तव
स्वदेशात ना लाभे सुख जे
यावे लागे येथे त्यास्तव

मर्ढेकर, कुसुमाग्रज म्हणती
काही वंचना होई तैशी
मध्यमवर्गिय निम्न मात्र मी
कौटुंबिकता विसरू कैशी?

हा ही माझा, तो ही माझा
देश तसे हे दोन्ही माझे
परदेशातिल स्थायिकतेचे
का वाटावे उगाच ओझे?

- निलेश पंडित

smita789


केदार मेहेंदळे

हा ही माझा, तो ही माझा
देश तसे हे दोन्ही माझे
परदेशातिल स्थायिकतेचे
का वाटावे उगाच ओझे?




khup chan  ani yogy vichar aahe.