नको चेतना नको स्पंदन

Started by madhura, May 01, 2012, 08:46:03 PM

Previous topic - Next topic

madhura


नको चेतना नको स्पंदन
गोठून जावे हे संवेदन
निवडुंगाचे जगणे व्हावे
कातळापरि व्हावे जीवन

द्वेष असो वा प्रेमाचे सिंचन
वा पोकळ नात्यांचे बंधन
दगडाचे काठीण्य मिळावे
नकोच आता ते हळवेपण

सुखाचा उल्हास नको अन
नको दु:खाचे व्यर्थ रुदन
शेवाळातच मढवून घ्यावे
कशास हवे फुकाचे लेपन?

अद्वैताला स्वत्त्व अर्पण
सोडून अवघे माझे मीपण
घाव साहण्या सज्ज असावे
दगडालाही येई देवपण ..

-- Vanita Tendulkar-Bivalkar

smita789


केदार मेहेंदळे