मी आणि सागर ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 02, 2012, 11:07:18 PM

Previous topic - Next topic
काल बसलो एकटाच
जिथे कुणीच सोबत नव्हते
मीच होतो एकटा आणि सोबत ते महासागर होते ....

मी होतो दुखावलेला ह्या नात्यांमध्ये गुरफटलेला
नात्यांनीही घायाळलेला
जिथे नव्हते कुणीच माझे
डोळ्यांत फक्त अश्रुच माझे

घेऊन आलो होतो मी डोळ्यांमध्ये पाणी
माझे ते पाणी उष्ण होते अन सागराचे शीतल पाणी
वाटले त्या सागरात आपण ही मिळून जावे
घेऊन जाईल जिथे कुठे तेथे निघून जावे ....

गेलो जवळ मी सागराच्या त्या
तो ही होता खूप रागावलेला
खवळलेल्या लाटा होत्या
वाटले त्यांमधेच कुठे माझ्या अखेरच्या वाटा होत्या
स्वार होऊन मग त्या लाटेवर
अखेर जगाचा निरोप घ्यावा ....
-
©प्रशांत शिंदे
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸ .•´ [♥]
☆ º [♥]प्रशू•´ [♥] º ☆

prasad26

खवळलेल्या लाटा होत्या
वाटले त्यांमधेच कुठे माझ्या अखेरच्या वाटा होत्या

Chan!


खवळलेल्या लाटा होत्या
वाटले त्यांमधेच कुठे माझ्या अखेरच्या वाटा होत्या

Chan!
dhnyvad prasad



nice Poem :)
धन्यवाद  ज्योती...