अंदाज आरश्याचा ...

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 03, 2012, 05:01:53 PM

Previous topic - Next topic

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे
पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे

रोज अत्यचार होतो  आरश्यावरती  आता
आरश्याला भावलेली  माणसे गेली कुठे

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा  तो चेहरा असावा ....!!

काठावरी  उतरली  स्वप्ने तहानलेली
डोळ्यात  वेदनेचा  माझ्या झरा असावा

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा....!!

जखमा कश्या सुगंधी  झाल्यात काळजाला
केलेत वर ज्याने तो मोगरा असावा

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा ....!!

माथ्यावरी नभाचे ओझे  सदा इलाही
दाही दिशा कशाच्या हा पिंजरा असावा

अंदाज आरश्याचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा ....!!

- भीमराव पांचाळ


abhijit manchekar

ही गझल इलाही जमादारांची आहे का ?