आदेश मरणाचा...

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 04, 2012, 12:54:21 PM

Previous topic - Next topic
तो आला दरवाज्यावर
घेऊन आदेश मरणाचा माझ्या
मी म्हणालो कोण तू
म्हणतो काळ आहे मी तुझा....
घाबरलो मी क्षण भर
खरच माझी वेळ आली ??

नंतर विचार केला
असे तरी कुठे मी जगतोय

मरून जगायची
तर सवय तू केलीच
आता निरोप देऊन
मृत्यूच कर प्यारी ....

मी हसत म्हणालो त्याला
घेऊन चला मला

मृत्यूही बीचकळला मला पाहून तेव्हा
त्याने विचारलेच मला
असा कसा रे तू....?
माझ्या येण्याने कापतात हि माणसे
विचारात मला पाडणारा
गडी पहिलाच तू आहेस

मी ही त्याला सांगितले
बघ....
मी तर आधीच मेलोय

आठवण आहेत तिच्या
म्हणून मी जगतोय
तिच्या आठवणीत
मी सारखा झुरतोय
किती मारशील तू
आता मला ही मारायचंय....

ये जवळ माझ्या मला असेच घेउनी चल
काहीच नको इथले मला
तिच्या आठवणीतून सुटका फक्त कर ....

बघ म्हणतो तुझी हि शेवटची घटका आहे
आताच इच्छा सांग मी पूर्ण करून देतो
सोबत तुला नेतो पण तुझा देह इथच ठेवतो

नको मला काही म्हणत
हसत जवळ मी गेलो
मला हसताना पाहत
मागे सरकत तो म्हणाला

तुझे हे प्रेम पाहून
मला काहीच सुचेना
मी आहे मृत्यू
पण....
मलाच तूझी दशा बघवेना

असा कसा रे तू मलाच घाबरवलेस
तुझे भय तू माझ्यावरच उलटंवलेस ...

आधीच मेलास तू
आता तुला मी काय मारू.....

जग थोडे तू
सुख तूलाही थोडे मिळू दे
आनंदाची हौस
तुझ्या चेहर्यावर येऊ दे

दुखी आहेस तू
तुला सुख मी देऊन जाईल ...

पुन्हा मी येईल तुला
नक्की घेऊनच जाईल

तुझ्या मागे रडणारे
सतरा मी तेव्हा पाहून जाईल ....
-
© प्रशांत शिंदे

30/3/12