तुझ्यासाठी

Started by kunal.a.kamble, May 04, 2012, 09:26:01 PM

Previous topic - Next topic

kunal.a.kamble

                               "कधी कुणावर प्रेम जडलेच नाही" 

सगळे म्हणतात कविता जमायला प्रेमात पडावे लागते...
मला कधी ते जमलेच नाही,
कधी कुणावर प्रेम जडलेच नाही....

असेच झाले एकेदिवशी, वारा जोराचा  वाहू लागला,
समोर येताच ती वादळ मनात निर्माण करून गेला...
पाहताच क्षणी तिला हृदयाचे ठोके वाढले,
का कुणास ठाऊक पावले आपोआप तिच्या मागे वळली...

त्याच क्षणी ठरवले आता आपण सुधरायाचे,
एकदा का होईना जाऊन तिच्याशी बोलायचे...
पण मला कधी ते जमलेच नाही,
कारण कधी कुणावर प्रेम जडलेच नाही...

निघून गेले दिवस, निघून गेली वेळ,
माझ्या मनाचा मी करून घेतला होता खेळ...
सावरण्याचा खूप प्रयत्न केला...
पण कधी मला ते जमलेच नाही,
कारण कधी कुणावर प्रेम जडलेच नाही...

आजही तिच्या आठवणीत मी रडत आहे,
तिच्या एका भेटीसाठी माझे मन झुरत आहे...
मनाला समजवायला सुरुवात केली आहे...
"माझे कधी कुणावर प्रेम जडलेच नाही"...

                                    कुणाल कांबळे


naresh telkeshwar


केदार मेहेंदळे