माझी आजी ! (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, May 06, 2012, 10:13:33 PM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore

माझी आजी !

तिचे घर
गळके, पडके आणि शेणाने सारलेले
असे वाटते
जणू त्याच थेंबानीच करते
प्रेमाचा वर्षाव आमच्यावर
अन् पडक्या त्या भिंतीसारखी असून
असे आधार आमच्यासाठी
शेणाने सारवून ती दरिद्रता दूर करते
आणि मन सुध्दा आपले

तिच्या घरात
एक चूल, गाठोडं आणि देवाचा देव्हारा
ती त्या चुलीतल्या लाकडासरखी
आज सुध्दा तेवत आहे आमच्यासाठी
अन् गाठोड्यात जपून आठवणी आमच्या
ते माझेच ह्या जाणीवे करिता
आणि आम्ही नसतोच तिच्या सोबत
मग तिला आधार कोणाचा ?
देवाचा .........

कवी - कल्पेश देवरे

PINKY BOBADE


केदार मेहेंदळे



Kalpesh Deore


bhanudas waskar

कल्पेश,

खुपच छान



****भानुदास वासकर****