तिला माहित होतं (कल्पेश देवरे)

Started by Kalpesh Deore, May 07, 2012, 12:06:32 AM

Previous topic - Next topic

Kalpesh Deore


तिला माहित होतं

तिला माहित होतं
पण तरी ती गेली
तिला माहित होतं
तरी ती गेली

मला म्हणाली मी तुझीच आहे
म्हणून मी तिला आपलंच मानलं
अन् तिच्यासाठी जगाला साऱ्या
मी खरोखरचं विसरून टाकलं

प्रत्येक श्वासात माझ्या
फक्त तिचच नाव होतं
अन् प्रत्येक स्वप्न देखील
मला तिचच पडत होतं

तरी देखील तिने माझ्या
भावनांची राखरांगोळी केली
तिला माहित होतं
पण तरी ती गेली
तिला माहित होतं
तरी ती गेली

माझं तिच्यावर मनापासून प्रेम
पण तिचे हे सगळे चाळे होते
ती खुपच सुंदर होती म्हणून
माझे विचारही फार भोळे होते

मला कळलेचं नाही
माझ्या मनाशी का खेळली?
तिला माहित होतं
पण तरी ती गेली
तिला माहित होतं
तरी ती गेली

जेथे गेलीस तू
तेथे सुखी राहा
आपल्या नवऱ्याच्या तरी
जरा मनाला पहा

भावना माझ्या असो किंवा त्याच्या
जरा काळजी घेण्याचा प्रयत्न कर
दगडालाही मन असतं
हे कळेल तुला वर गेल्यावर

तू गेल्यावरच कळलं
की तू मला किती छळली
तिला माहित होतं
पण तरी ती गेली
तिला माहित होतं
तरी ती गेली   

कवी - कल्पेश देवरे