नाते अनोळखी . . .

Started by Deepak Pardhe, May 07, 2012, 04:19:40 PM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe


काही असतात अशा आठवणी, ज्या मनात वसुनी राहतात,
कोण कुठली माणसे काही, आपलीशी मग वाटतात,
असेच नाते माझे जुडले, होते जे अनोळखी,
वेगवेगळे जरी किनारे, पण ती लाट माणुसकीची . . .

असा वेगळा प्रवास झाला, त्या पैलतीरावर जावून थांबला,
भाषा वेगळी प्रांत हा भिन्न, कसे जमेल हा प्रश्न दाटला,
गाठ भेट ती अशी जाहली, नव मायेची फुंकर लाभली,
अनोळखी त्या नात्यामध्ये, वेगळीच मग गोडी वाढली . . .

लग्नाचा तो योग होता, कार्य असे तिथे घडत होते,
त्या क्षणांचा आनंद घेत, मन पाखरू होवून गात होते,
अशी पाखरे त्या फांदीवर, खेळ सुखाचा खेळत होते,
काय थोर नि काय लहान, प्रेमात सगळे गुंफले होते . . .

असा विरघळलो रंगात त्यांच्या, जसा मी हि एक पाखरू,
क्षणांत मने जिंकून घेईल, अशा गायीचं मी वासरू,
एक विनंती करतो देवा, असा हास्यरंग वसू दे,
तुटून सगळी दुखाची गाठ, एक प्रेम गाठ बसू दे . . .

असा क्षण हा जीवनात आला, जो कधी न मी विसरणार,
असाच फिरत प्रत्येक तीरावर नाती मी जोडणार . . . अशीच नाती मी जपणार . . .


- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्स न जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in)


Deepak Pardhe



Deepak Pardhe