गझल

Started by dhanaji, May 07, 2012, 05:31:32 PM

Previous topic - Next topic

dhanaji

पुढ्यातला मी पिऊन प्याला खुशाल आहे!
मलाच ठाऊक की, किती तो जहाल आहे!!

उजेड मागावयास जाणार मी न कोठे;
अजून तेजाळ काळजाची मशाल आहे!

भले कितीही पडो कडाका, फिकीर नाही.....
तुझ्या स्मृतींची लपेटली आज शाल आहे!

फुलावयाची असे फुलांनाच आज चोरी;
हरेक बागेमधील माळी दलाल आहे!

खुशाल तू जाळ झोपड्या पण, नकोस विसरू......
इथेच कोठे तरी तुझाही महाल आहे!

इथेच मी प्राण सोडला झोपडीत माझ्या;
जिथे उभा आज राजवर्खी महाल आहे!

कधीच झाल्यात बंद वाटा जगावयाच्या;
तरी तुझी वाटचाल चालू? कमाल आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

prasad26


प्रशांत नागरगोजे

Khup chaan lihili ahe..

केदार मेहेंदळे


विक्रांत

छान !! रंग आला .

atulmbhosale

very nice .....
    lihit rahaave.

Vaishali Sakat


sharad kusare

chaan barech divasanantar chagli gazal vachayala milali

Çhèx Thakare

अस्सल नाशिककर शब्द

एका अप्रतिम गजल साठी

" एकच नंबर  "

मिलिंद कुंभारे

उजेड मागावयास जाणार मी न कोठे;
अजून तेजाळ काळजाची मशाल आहे!

मस्तच...... :)