हातातून हात सुटतील :(

Started by janki.das, May 07, 2012, 05:39:18 PM

Previous topic - Next topic

janki.das

आता काही वेळाने हातातून हात सुटतील
इतका वेळ आवरून धरलेले बांध फुटतील !
दाटून आलेल्या भावना दोन क्षणात मावतील
श्वास गुदमरून जाईल अन् डोळे पाणावतील !
हातातले हात घट्ट होत सोडवणार नाहीत
बोलघेवडे शब्दही नेमके मुके होतील !
एकमेकांच्या डोळ्यात क्षण क्षण रडवेले होतील
सहवासाचे सारे सारे कण कण ओले होतील !
सुन्न सुन्न मनाची पावले आणखी जड होतील
विरहातली अगतिकता स्वीकारायला मने दगड होतील ?
तुझ्या जाण्याचे वास्तव मन मानणार नाही
गोठलेल्या शरीरातही मग मनाचे बंड होतील !
आता काही वेळाने हातातून हात सुटतील
रोखून धरलेले हुंदके , आसू आतल्या आत तुटतील !

-- शरद दातार .

केदार मेहेंदळे



प्रशांत नागरगोजे

खूप छान आहे कविता ...