एका चिल्लर क्षणी ती आपल्या प्रेमात पडते ...

Started by janki.das, May 07, 2012, 05:42:29 PM

Previous topic - Next topic

janki.das

एका चिल्लर क्षणी
ती आपल्या प्रेमात पडते ...
एका चिल्लर क्षणी
सगळं मनासारखं होत जातं..!
आपल्याला आवाज नाही आला तरी ..
आपली चिल्लरगिरी सगळीकडे खूळखुळते ..!!

नंतर ..
काही बंदे रुपये..
आपण वाजवत फिरत असतो..
दुकानात , मॉल मध्ये ..
आवाज आला नाही तरी ..

अन उरलेली चिल्लर
देवळांत भिका-या समोर
आवाजासकट फेकून
दानशूर होत असतो आपण ..

अन एका चिल्लर क्षणी
लग्नाचे काही फोटो बघताना ..
तिचं खोटं खूळखूळणार हास्य बघून ..
तिच्या नव-यासमोर ..
मला दानशूर झाल्यासारखं वाटतं !!
बिना आवाजाचं!!

-- विनायक
१२ जून २०११

केदार मेहेंदळे