हास्य दिन { विनोदी कविता }

Started by janki.das, May 07, 2012, 05:51:11 PM

Previous topic - Next topic

janki.das

हास्य दिन, रुदन दिन,
उत्साह दिन, नैराश्य दिन,
चुस्त दिन, सुस्त दिन...
तडजोड दिन, हट्ट दिन...

यश दिन, अपयश दिन...
मैत्री दिन, शत्रू दिन...
सलोखा दिन, भांडण दिन...
लग्न दिन, घटस्फोट दिन...

दिवसानुसार कृती केली
आणि प्रत्येक दिवस अंगाशी आला,
या सगळ्या दिनांच्या भानगडीत ....
एक दिवस माझाच स्मृती दिन आला...

काहीही कळायच्या आत
थेट नरकात रवानगी झाली...
अरे वेड्या, बुद्धी गहाण ठेवलीस ?
दरवाज्यातच विचारणा झाली.

नरकात मोठा प्रश्न पडला
'या' दिवशी लोक काय करतील ?
कुणीही आलं नाही भेटायला,
कुणाला सवड जे 'दिन' पाहतील ?

आणि मग फेसबुकवर माझा
स्मृती 'दिन' जाहीर झाला,
बघता बघता हजारोंनी
'शेअर' आणि 'लाईक' ही केला.

पण एकाही एफ बी फ्रेंड चं
कृती करण्याचं धाडस नाही..
स्वागताला मी सज्ज असूनही
काळं कुत्रंही फिरकलं नाही.

प्रमोशनवर ट्रान्स्फर झाली स्वर्गात...
तरीही भेटायला कुणी आलं नाही,
कारण पृथ्वीवर होर्डींग्ज लागली होती
"कृतीला 'दिना'चं निमित्त लागत नाही."

हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..

-- चंद्रकांत पागे

केदार मेहेंदळे

हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..
हा...हा...हा...हा..




:D ;D