तू गेलीस तेव्हा ..!!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, May 08, 2012, 12:55:51 PM

Previous topic - Next topic
तू   गेलीस तेव्हा
जोरात पाउस पडत होता
मला माहितच नव्हतं
तो माझ्याच झोपडीला भिजवत  होता
तू गेलीस तेव्हा
वारा  ही  जोरात  होता
तुझ्या हुंदक्यांना तो मला ऐकवत होता
तू गेलीस तेव्हा
काळोख पसरला होता
चंद्रही जनू  अमावस्या समजून दिवासाच  उगवला होता
निद्राही उडून गेली माझी
आठवत तुला बसलो
कूस बदलून हैराण झालो
स्वप्नही पडेना .....!!
तू गेलीस  तेव्हा
फुलही  हिरमुसले
माझ्या कडे पाहत त्याने पाकळ्यांना अश्रू समजून गाळले
काटे हि तीक्ष्ण झाले  जे अंगास टोचू लागले
काळी माती  हि माझ्या अश्रूना  मुलासारखी  जपू लागली
गाणी बंद झाली
शब्द मुके झाले ......!!
तू गेलीस तेव्हा
अश्रूंचा पूर आला
लाटावर आठवणी तुझ्या आल्या
अर्धमेला झालो मी
तू गेलीस तेव्हा ........!!
-
प्रशांत शिंदे