मुलगी

Started by प्रशांत नागरगोजे, May 08, 2012, 07:56:30 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

           मुलगी
लहानपणी शिकवायचे गुरुजी,
असतात आईबाबा देवासमान.
पण पडतो आता मनाला प्रश्न
लहानपणीच जीव घेणारे जन्मदाते,
खरंच असतात का रे देवासमान?

आई असते रूप एक मुलीचंच,
तरी का मग कोंडतात श्वास जन्मदाते,
लहानपणीच त्या निष्पाप लेकराचा,
खरंच असेच असतात का रे आईबाबा?

आता मुली नको असतात आईबापाला,
नको असतो हुंड्याचा भारा.
पण मुलाच्या लग्नात का हे निर्दयी,
घेतात रे मग ढीगभर हुंडा ?

म्हणतात मुलंच असतात घराचा दिवा,
मग मुलींना वातीचापण दर्जा नाही का रे?
जन्मादात्रे, तू तर कुठे आहेस गं दिवा?
पण कोण सांगणार हे दुनियेला?
                    -आशापुत्र



follow my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

jyoti salunkhe


प्रशांत नागरगोजे

धन्यवाद ज्योती ... :)