नजाकत

Started by शिवाजी सांगळे, July 02, 2026, 11:54:53 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

नजाकत

अलवार भावनेचा हुंकार नजाकत
शब्दांतला हळवा उच्चार नजाकत

पदन्यास थरथरता, तो ठेक्यावरला
गिरकीत सावरलेला तोल नजाकत

अनेक छटा येथे ऋतूंच्या बदलत्या
मृदगंध पावसाळी, एकच नजाकत

बाल मुखातील अप्रूप, बोल बोबडे
उच्चार हळूच तीचा,बाबा नजाकत

तमा न कसली उन,वारा,पावसाची
दर्शन होते सावळ्याचे,ती नजाकत

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९