बघ विचार कर ...

Started by Sudhir Matey (Midastach), May 12, 2012, 03:31:47 PM

Previous topic - Next topic

Sudhir Matey (Midastach)

 बघ  विचार  कर ...


या   लपाछपित , आपलेच  आणि  आपल्या  मैत्रीचे 
अतोनात  नुकसान  होत  आहे , , , बघ  विचार  कर ...

आपण  विश्वास  निर्माण  करतो , कुठेतरी  माशी  शिंकते
, आणि  शंका  निर्माण  होतात ,,, बघ  विचार  कर   ....

आपण  भलेही  दीर्घकाळ  सोबत  असतो ,
पण  एक  दुसर्याला  समजून  घेण्यासाठी  वेळ  नसतो ,,, बघ  विचार  कर ....

समजून  तर  घेतो  पण  लवकरच  मांजर  आडवी  जाते ,
आणि  पुन्हा  जैसे  थे , , असे प्रत्येक वेळेस घडते , बघ  विचार  कर ....

कधी  एखाद्या  विषयासाठी  नाराजी ,
कधी  एखाद्या  शब्दासाठी  नाराजी ..
मैत्रीचे  सूर   याने  बेसूर  होत  आहेत   .... बघ  विचार  कर ...



मेघ दाटून येतात , मन विषारी होते,
विश्वासाचे नाते अविश्वासात क्षनात बदलून जाते,
खेळ  संपल्यासारखा वाटतो....   बघ  विचार  कर ...




मैत्रीच्या  भल्यासाठी आणि टिकावी म्हणून,  प्रयत्न करत असतो,
कुठून तरी मिठाचा खडा पडतो, गोडव्याचे रुपांतर 
खारटपनात कधी होते कळतच नाही ...       बघ  विचार  कर ... 

अंती एवढेच म्हणू शकतो कि  माझ्या तळ्यात बरेच खडे टाकलेत तरंग उठले आणि शमले,
काही खडे तुझ्या तळ्यात पण टाकले असतील त्याचे पडसाद पण उमटलेच असतील,
शब्दांचा खेळ आहे, जसा हवा तसा फिरवता येतो   ....
बघ  विचार  कर .

..बघ  विचार  कर ...बघ  विचार  कर ...

केदार मेहेंदळे