आई

Started by Ratnadeep Rane, May 12, 2012, 05:49:57 PM

Previous topic - Next topic

Ratnadeep Rane

जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले
जिच्या पदरात आपण बालपण घालवले
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही
अशी ईश्वराचा साक्षात रूप म्हणजे आई

आभाळापेक्षा उंच जिची माया
सागराहूनही खोल जिचे प्रेम
ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार
बाळाचं रडणे ऐकून सुसाट धावत जी जाई
अशी न संपणारा प्रेमाचा सागर म्हणजे आई

स्वतः खेळणं बनून अंगाखांद्यावर खेळवले
हात पकडून अ आ इ ई गिरवायला जिने शिकवले
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले
प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई
अशी दयाची घागर म्हणजे आई

जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही 
जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोल नाही
जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय
तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय
कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे आई

नजर न लागावी म्हणून काजळ लावणारी आई असते
चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास भरवणारी आई असते
अपूर्ण असलेला घरचा अभ्यास पूर्ण करणारी आई असते
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाट पाहणारी आई असते
एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई

कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आई असते
तर कधी चुक्यांवर रागावणारी आई असते
आपल्या दु:खात रडणारी सुखात हसणारी आई असते
पावसात भिजून आल्यावर पदराने डोकं पुसणारी आई असते
जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल अशी साठवण म्हणजे आई



                                                                                     
                                                                                   कवी :  रत्नदिप राणे
                                                                                         खार (पश्चिम), मुंबई
                                                                                         बी. पी. एम. हायस्कूल



                                                                                                                               


Ratnadeep Rane

Mother Day Special

PINKY BOBADE


mrunalwalimbe

खरंच सुंदर  :)

Digambar Gaikar

जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार अशी ती आई
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले
जिच्या पदरात आपण बालपण घालवले
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही
अशी ईश्वराचा साक्षात रूप म्हणजे आई

आभाळापेक्षा उंच जिची माया
सागराहूनही खोल जिचे प्रेम
ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार
बाळाचं रडणे ऐकून सुसाट धावत जी जाई
अशी न संपणारा प्रेमाचा सागर म्हणजे आई

स्वतः खेळणं बनून अंगाखांद्यावर खेळवले
हात पकडून अ आ इ ई गिरवायला जिने शिकवले
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले
प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई
अशी दयाची घागर म्हणजे आई

जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही 
जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोल नाही
जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय
तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय
कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे आई

नजर न लागावी म्हणून काजळ लावणारी आई असते
चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास भरवणारी आई असते
अपूर्ण असलेला घरचा अभ्यास पूर्ण करणारी आई असते
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाट पाहणारी आई असते
एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई

कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आई असते
तर कधी चुक्यांवर रागावणारी आई असते
आपल्या दु:खात रडणारी सुखात हसणारी आई असते
पावसात भिजून आल्यावर पदराने डोकं पुसणारी आई असते
जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल अशी साठवण म्हणजे आई



Rupali gaware

Swami tinhi jagacha aai vina bhikari he vidham chukiche nahi.

Manisha Popeta

अप्रतिम........ :)

कवि - विजय सुर्यवंशी.


balaji ranvirkar