उगवती

Started by kumudini, May 13, 2012, 07:41:26 AM

Previous topic - Next topic

kumudini

      उगवती



किलबिल पाखरांची

दुरुनीच ऐक़ू  आली

झाली पहाट कळली

सृष्टी फुलून आली



मौक्तिक हे दवाचे

पाचू जळात न्हाले

आकंठ  डूमबुनिया 

असती तिथे विराले



हे किरण भास्कराचे

पाण्यावरी तरंगे

होऊन कांचनाचे

असती तिथे निमाले



वाहे खटयाळ वारा

कलीकास जागवाया

उधळून  मुक्त गंधा

गंधालि तीहि झाली



सौंदर्य हे धरेचे

वाणीस मौन आणे

गगनास पाहताना

मौनास अर्थ लाभे

           कुमुदिनी काळीकर 

केदार मेहेंदळे