प्रथमेश

Started by kumudini, May 13, 2012, 08:07:25 AM

Previous topic - Next topic

kumudini

    प्रथमेश

रूप तुझे आगळे
गणेशा  सर्वाहूनी वेगळे

गजेंद्र आनन तुझसी शोभे
मूषक वाहन तेथ विराजे 
सान थोर हे तुझ्याच ठाई
एकवटे सगळे

अससी  व्दिज तू रूढार्थाने
परभ्रम्ह परी सर्वार्थाने
आदी अंत तुझ नाही वर्णिती
वेद असे सगळे

बुद्धीदाता तू परमेश्वर
शब्द सृष्टीचा तू सर्वेश्वर
तुझ्याच पाई वंदून गाती
ओंकारा सगळे

प्रथ्मेशां   तू  ज्ञातच सर्वा
कार्यारंभी नित्य पुजावा
कार्यसिद्धी ती होण्यासाठी
नामिताती सगळे

सुखकारक तू दुख निवारक
वरदायक तू पाप विमोचक
संकटकाळी तुझ्याच पाई
शरण असे सगळे

रक्त पुष्प दुर्वांकुर वाहून
यथा शक्ती ते करुनी पूजन
तेवून माथा तव चरणावर
आनंदिती सगळे
                                 कुमुदिनी काळीकर