आई

Started by kumudini, May 13, 2012, 04:55:44 PM

Previous topic - Next topic

kumudini

               आई

वात्सल्य  मूर्त  आई तुक्ष्यत पाहता हे

अंतरीचा राम तुझ्या रुपात दिसत आहे

सर्वाधि देव माझा आईच जगती आहे

सारीच पुण्य  क्षेत्रे येथेच नांदताहे

झेलीन संकटाना तव चिंतनासमेत

विसरीन दुख अवघे शिरुनी  तुझ्या कुशीत

नयनात ज्योती तुझिया सन्मार्ग दावताहे

माया तयामध्ये ही नित्य तेवताहे

संजीवनी तुझ्या या स्पर्शात आई आहे

आनंद  हृदय डोही मी नित्य  डूम्बताहे

वर्णू शकेल तुजला जगतात कोणी नोहे

आईस एक आई कोशात शब्द आहे

                                  कुमुदिनी काळीकर