देव आणि भक्त-१

Started by प्रशांत नागरगोजे, May 13, 2012, 05:34:05 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

(समाजातील काही विनोदी प्रसंग आणि काही मनाला लागणारे प्रसंग "देव आणि भक्त" या सदरातून  मांडत आहे.)

(देव आणि त्याचा भक्त सकाळ-सकाळ फेसबूकवर...)
भक्त:- देवा, ग्वाड मार्निंग.
देव:-   काय?.. काय म्हणालास?
भक्त:- काय देवा, तुले इंग्लिश येत नाय व्हय. कसा रं तू? रामराम   म्हणलं.
देव:-   रामराम !! आयुष्यमान भव. लेका मराठीत बोलत जाकी राव.               
भक्त:  चुकलं देवा, माफ कर. देवा, ये देवा..काय करतुयस रं?
देव:-   आत्ताच झोपातून उठलोय बघ, खालचं बघतुया.
भक्त:- आरं ये देवा, आसलं काय बोलतूस? देव हायस नव तू? तुला शोभतय का असलं?
देव:-   अरे गाढवा, खालचं म्हणजे खाली पृथ्वीवर बघतूय काय चाललय ते. नको तसला अर्थ काढू नगस.
भक्त:- माफ कर देवा, तूबी जरा नीट बोल कि रं. बर देवा, मी दिसतोय कारं तुला? हे बघ, इथं कवाडात उभाय मी. दिसलं का?
देव:-   अं...हा दिसलास..दिसलास कि लेकाच्या. अन् कायरं, फक्त लंगोटीवरच कारं? आरं ते बघ, ती बाजूची मुन्नी तुझ्याकडं टक लावून बघायलीय. काहीतर घाल की लेकाच्या.
भक्त:- आरं देवा, मी मुद्दामच असं पोज दिलाव. त्या मुन्नीचं सोड, इकडं बघ. बर देवा, मला एक विचारायचं हाय? विचारू का?
देव:-   काय रं? विचार की. काय मुन्नी पाहिजेले का?
भक्त:- तसलं काय नकोय, दुसरच कायतरी पाहिजेले. देणार असाल तरच मांगतो. मान्गू का?
देव:-   मांग, तुले जे पाहिजेले ते तू आज मांग.
भक्त:- जिक रे तू देवा. मंग आईक. माझा या पोजमध्ये एक फोटो काढशिले आन तुझ्या फेसबूकच्या प्रोफाईलचा कव्हर फोटो ठेवाशिले.
देव:-   भक्ता, हे सोडून तू काहीपण मांग. तुले गाडी देतो, बंगला देतो, मुन्नी देतो, पोरंबाळ देतो. पण हे सोडून काही मांग. तुझ्या फोटोनं माझ्या स्टेटसला कुनीबी लाईक आन कॉमेंट नाय करायचं. बाकीचं देव मला ब्लॉक करत्याल रं. तू दुसरं काहीपण मांग लेका.
भक्त:- काय लाका देवा, असंच का? आरं तू मला भक्त मानतोस ना !! मंग टाक की राव माझा कव्हर फोटो.. माझ्या फोटोला लई लाईक भेटतील, तू बघच. झुकरबर्गची शप्पथ. आरं माझा कव्हर फोटो टाकल्यावर बाकीचं देव आन् लोक तुझ्या भक्ताला आधी बघतील आन् मंग तुला नमस्कार करत्याल. तुले नाय कारं वाटत तुझ्या भक्ताला लाईक भेटावं? देवा कर की लेका फोटो अपलोड, फक्त ४२० केबीची ईमेज हाय. तुला पण लई प्रसिद्धी भेटल रं. तुझं एखाद-दोन सबस्क्रायबर वाढतील तेवढंच. 
देव:-   (god is offline. Send him message.)
भक्त:- बस भोव देवा, काही मांगीतलकी ऑफलाईन जायचं भोव. थांब तुले आता फोटोत ट्यागचं करतो. अन् रसिका, तुम्हासनी असं ऐकायला बर वाटत हायना?..मंग कसं वाटलं ते पण जरा सांगा की राव. येतो परत.... 
                                                                                                                                   (क्रमशः पुढे चालू..) 
लेखक: प्र. बा. नागरगोजे (आशापुत्र )

follow my blog at www.prashu-mypoems.blogspot.com