व्यथा आर्जवाची

Started by kumudini, May 13, 2012, 05:39:00 PM

Previous topic - Next topic

kumudini

             व्यथा आर्जवाची

सवाल तुम्हा एकच  पुसते रामा रघुराया

लाडकी जनकाची तनया

काय गुन्हा मी केला होता

म्हणुनी मजला वनी धाडीता

राघुकुलाची न्याय देवता

काकारीते अन्याया

श्रीरामाने राक्षस वधिले

अग्निदिव्य मी तेव्हा केले

सांग लक्ष्मणा सांगा मला   तू

होता णा साक्षी या

राघुकुलाच्या सुपुत्राला स्वाधीन करुनी राघुरायला

कृतार्थ झाले जीवनात मी करिता नीज कर्ताव्या

नकोच आता भोग भोगणे  नकोच आता  काही सोसणे

धरती आई कुशीत घेई चीर विश्रांती द्याया

                         कुमुदिनी काळीकर