आई तुझी आठवण (my first poem)

Started by mrunalwalimbe, May 14, 2012, 08:59:25 AM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

    आई तुझी आठवण

आई म्हणजे मूर्तिमंत माउली

घाले सदैव मायेची सावली

असे कर्तव्यतत्पर अन उत्साही

धावे सदैव दुसर्यांसाठी     

म्हणे करावे कर्म मनःशांतीसाठी 

धरावी कास सत्याची

ठेवावा विश्वास भगवंताच्या चरणाशी

आई म्हणजे ज्ञानाचा  झरा

                   मायेचा ओलावा

आई म्हणजे खळखळता झरा

                 उत्साह अन आनंदाचा

आई म्हणजे  हृदयाची  हाक

                    निःशब्द    जाग

आई म्हणजे  क्षमेची मूर्ती

मुलांचे अपराध पोटात घालणारी

आई होती परोपकारी

स्वत साठी  न  जगता

इतरांसाठी  जगत राहणारी

आई तुझी आठवण येते

तू आहेस माझ्या चराचरात

सदैव तेवत माझ्या मनात

            मृणाल वाळिंबे


Ratnadeep Rane

Mrunal tuzi first poem kharach chan ahe, keep it up........... :)