ऋणी तुझा

Started by प्रशांत नागरगोजे, May 15, 2012, 03:30:32 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

 

क्षणांचं होतं नातं आपलं
खूपकाही दिलस तू, या क्षणांत
आपल्या पहिल्या भेटीपासून ते अखेरपर्यंत
काहीनाकाही तू देतच गेलीस..
परतफेडीची तिळभरही अपेक्षा न बाळगता
तू देतच गेलीस ....मी घेतच गेलो
देता-देता तू, विरहही दिलास
मीही बंद डोळ्यांनी तो स्वीकार केला
करता येणार नाही परतफेड याची मला
न काही मी देऊ शकणार तुला
कळताच हे पाणावले डोळे
हृदय चिरचिर तुटले
तू लावलास छंद जखमांना चघळण्याचा
राहील पाखरा, मी ऋणी तुझा     
                       -आशापुत्र

केदार मेहेंदळे



PINKY BOBADE