मृत्यू

Started by sharktooth19, May 16, 2012, 10:41:07 PM

Previous topic - Next topic

sharktooth19

Re-uploading one of my old poem on the occasion of Mothers' Day.. (moderator you can delete the older post)

चित्राच्या सुरुवातीला असते एक रेघ..
एकाकी, एकटीच..
सर्व चित्राचा भार सोसण्यास तयार.
वाट पहात असते ती बाकी रेघोट्यांची..
हळूहळू बाकिच्या येतात,
हातात हात घालून एक चित्र तयार होते.
नंतर मात्र तिच रेघ बेढब दिसू लागते..
चित्राचं सौंदर्य कमी करणारी..
आणि तुम्ही तिला खोडून टाकता..
चित्र मात्र बिघडत नाही,
उलट ते चांगलं दिसतं..

त्यासाठी झालेला एका रेषेचा मृत्यू
मात्र कोणालाच दिसत नाही

केदार मेहेंदळे