तुच म्‍हणायचीस ना.....!

Started by Vira, May 18, 2012, 05:35:02 PM

Previous topic - Next topic

Vira

तुच म्‍हणायचीस ना.....!



तुच म्‍हणायचीस ना
की,
मला तुझ्यावीना करमत नाही रे,
तुझ्यावीना एक क्षणही
सुखचा जात नाही रे.

माझ्या ओठांवर
तुच का असतोस,
आणि माझ्या स्‍वप्‍नातही
तुच का रे दीसतोस.

मी तुझ्या प्रश्‍नांनवर
मनातल्‍या मनात हसायचो,
उत्‍तरात तुला
'हेच ते "प्रेम"'
असे सांगायचो.

माझे उत्‍तर एकूण तु
मस्‍त लाजायचीस,
नंतर तो लाजलेला चेहरा
स्‍वताच्‍या हाताने झाकायचीस.

तुझी ती अदा
खुपच मनमोहक असायची,
त्‍यातल्‍या त्‍यात तु मला आनखी
वेडाही म्‍हणायचीस.

पण.....
पण तुला माझा असा
कुठला राग आला हे,
की
तुझ्यासाठी हा वेडा
एकदमच परका झाला हे.

तुझ्याचसाठी हसायचा,
तुझ्याचसाठी रडायचा,
हाच तो चेहरा ना ग
जो तुला स्‍वप्‍नात दीसायचा.

मग माझ्याशी आता तु
अशी का ग वागतेस,
मी दीसल्‍यावर अशी
नजर का फिरवतेस.
आता असे का ग......

माझ्यासाठी तुझ्या मनात
इतका राग का आहे,
का मी खरच
इतका वाईट आहे.

जाता जाता या वेड्यावर
एक उपकार करशिल का,
मला तुला काही  सांगायच हे
एकदाच मला भेट‍शील का.

फक्‍त.....
फक्‍त एकदाच भेटून जा,
मला माझी चुक नको
शिंक्षा तर सांगुन जा.

नंतर मग....
तुझ्या ओठांवर काय, तर
तुझ्या स्‍वप्‍नातही येनार नाही,
आणि तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.
तु शोधशील तरी हा वेडा तुला
ह्या जगातही सापडणार नाही.

- विरा