विरह

Started by प्रशांत नागरगोजे, May 19, 2012, 06:44:43 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

डोळ्यांसमोर फक्त तिचाच चेहरा आहे 
मनात तिच्या आठवणींचा गोंधळ आहे
डोळ्यांतून अश्रू वाहत आहे
कंठात हुंदकाही आता जागणार आहे

मन भरकटलेल्या अवस्थेत निपचित पडणार
हृदय तिच्यासाठीच फक्त गीत गाणार
त्या गीतात माझ्या विरानतेचा सूर असणार
अशा विरानतेत दुःखही कळवळणार

उदयाप्रमाणे एकवेळी माझाही अस्त होणार
पण तिच्यासाठीचं प्रेम चिरकाळ तेवत राहणार
दिवसाखेर आकाशात चंद्र, तारे असणार
माझ्याअखेर मात्र तिच माझी असणार
                             -आशापुत्र 

केदार मेहेंदळे

दिवसाखेर आकाशात चंद्र, तारे असणार
माझ्याअखेर मात्र तिच माझी असणार


khup chan..

प्रशांत नागरगोजे

धन्यवाद केदारजी.... :)

PINKY BOBADE


प्रशांत नागरगोजे

धन्यवाद पिंकी... :)

swati121

Dolyasamor fakt tichach chehara asto.............
Tichyach sathi fakt maza jiv zurto........

Sodun geli ahe ti mala nehanisathi........
Tarihi tila pahanyasathi jiv talmalato.........