मी माणूस

Started by प्रशांत नागरगोजे, May 21, 2012, 07:50:52 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मी माणूस
सर्वात बुद्धिमान
खरंच!!
पण, मला नाही वाटत!
कारण....कारण...
माझ्या रोजच्या जीवनात
कुठेतरी असंख्य हानी होताना
अस्पष्टपणे त्याचं कारण
मीच बनतोय....

कुठेतरी दिवस-दिवस लोक
उपाशी मारताना...मी मात्र
अर्ध्या ताटावरून मी उठतोय

कुठेतरी तहानलेले
जीव असताना...मी मात्र
पाणीच पाणी वाया घालतोय

अनेक जीवांना, अनेक प्राण्यांना
बेघर करून...मी मात्र
सिमेंटचे जंगल वाढवतोय

ज्या पृथ्वीवरचा मी
आहे पाहुणा दोन दिवसांचा
त्या घरकुलात मी
आग लावून जातोय

आग लावलेलं घर
दुरुस्त करायचं सोडून
चंद्र, मंगळाच्या निर्जीव महालात
फडफडायला चाललोय

मी खूप प्रगत झालोय
सर्व सुख चैनी मला लाभाल्यात
तरी माझी जात
शांत कुठे बसतेय

आज प्रत्येक वाईट गोष्टींचा
मी निषेध करतोय
पण जेव्हा कळत की
यामागे मीच आहे...मी मात्र
न थांबता धावतच राहतोय

मग मी माणूस कसा?
अन् बुद्धिमानतर मुळातच नाही
तो धावणारा मी माणूस कसा?
मला थांबवा...मला थांबवा
नाहीतर त्या विध्वंसात
मी नष्ट होईल
मी माणूस नाही
माणसा मला वाचव
माणसा मला वाचव 
                   -आशापुत्र

केदार मेहेंदळे

khup chan prashantji..... khup chan vichar kela aahet.

प्रशांत नागरगोजे

धन्यवाद केदारजी ... :)