काळ पुढे चालला

Started by Dr.Vinay Kalikar, May 21, 2012, 01:54:19 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

चालला रे चालला
काळ पुढे चालला
उभा मी इथे जरी
अन्ता कडे  चालला .

भीती कुणास संपण्याची
इच्छा कुणास अमरत्वाची   
सोबत दूरच्या  प्रवासाची 
जोडी अमर, नाश्वन्ताची.     

आत्म्यास नाही वय
काळाचेही नाही भय
घटका भरून आली जरी
मार्ग क्रमितो अनंता परी .

मिळतील  धुळीस धूळकण
अन पाणी सागरास
अक्षय आकाश ,वायू ,तारे
आत्म्यास संगत देती सारे .

___विनय काळीकर ____
____नागपूर _________

केदार मेहेंदळे