येत जा सखे

Started by शिवाजी सांगळे, July 09, 2026, 12:36:11 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

येत जा सखे

अप्सरा म्हणू की, म्हणू तूला, मोहना
वेड लावते मनाला, अशीच तू यौवना

तू कोमला,चंचला लाघवी रूपगर्विता
नाद लावी चाहूलीने येथल्या मनामना

बावरतो हरवतो हा जीव वेडा भाबडा
आठवूनी सुंदरी, मदालसा तूला पुन्हा

जाणीवेत चुंबनाच्या अमृतमय ओढीने
तापते अंग अंग,जाळते झनी तनामना

तलम, सुस्त मृदुला, पहाट स्पर्शातली
ठेवते मधुर मधुर, तनुगंधातल्या खुणा

आवर्तनात खेळण्यास शृंगार खेळ हा
फिरूनी येत जा सखे, स्वप्नात तू पुन्हा


©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९