हातोडा

Started by शिवाजी सांगळे, July 09, 2026, 10:29:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

हातोडा

पावसाचा जोर, थोडासा काय वाढतो
कनेक्टींग लिंकचा, स्लँबच कोसळतो

पुलांची पण आता, सुरू झाली स्पर्धा
कुठे कोसळतोय अख्खा न् कुठे अर्धा

दोष भुकंपाला देई कुणी एक ठेकेदार
उद्घाटने नी फोडाफोडीत दंग सरकार

अँक्ट ऑफ गॉड की नैसर्गिक आपत्ती
काहीही असो,आहे जनतेचीच संपत्ती

टक्केवारी, हिश्याचा मोह आता सोडा
त्रासलेल्या जनतेकडून पडेल हातोडा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९