अशी मी तशी मी.......कोणास ठाऊक कशी मी ?

Started by Tinkutinkle, May 22, 2012, 07:49:14 AM

Previous topic - Next topic

Tinkutinkle

.
अशी मी तशी मी
कोणास ठाऊक कशी मी ?
,
परि , मी ना नभीचा चंद्रमा
मी ना कोणी अप्सरा,
मी वनीचे गुलाबफुलही नाही
अन् या वाऱ्‍याची चाहुलही नाही,
,
माझा आवाज विचार माझे
कुण्या झुळझुळ झऱ्‍याचे, ते गीत नाही
मन माझे माझी सुंदरता
कुणी नटलेली साजिरी, बाहुली मी नाही
,
मी ना पाऊसधारा
मी ना मोरपिसारा,
ना धरेचा सुगंध
ना पक्षी भिरभिरणारा,
,
माझे वेगळेपण मीच आहे
मला अपवादही मीच आहे,
,
नकोत मज कोणत्याच उपमा
मी म्हणजे मीच आहे
माझी ओळख हीच आहे.
.
-व्टिँकल देशपांडे.


केदार मेहेंदळे



shashaank

नकोत मज कोणत्याच उपमा
मी म्हणजे मीच आहे
माझी ओळख हीच आहे.

aishay sundar, khoopach surekh kavitaa.

प्रसाद पासे



केदार मेहेंदळे