पराभव

Started by mrunalwalimbe, May 22, 2012, 03:50:55 PM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

पराभव
पराभव  म्हणजे लौकिक अर्थाने
           नापास
पराभवरुपी सागरात तरण्यासाठी
तुमची इच्छाशक्ती  लागते  प्रबळ
पराभव  असतो क्षणिक
त्यासाठी कशाला त्रागा
पराभव पचवावा
अन_ त्याचा शोक  न करता 
नवीन वाट शोधावी
हवीहवीशी , जय मिळवून देणारी
  विजय झाला  की
प्रगती खुंटते
पण पराभवात मात्र
    माणसाला खूप दिशा मिळतात
म्हणूनच त्याची प्रगती वाढते
    वाऱ्यासारखी झपाट्याने
अन_ त्या प्रगतीचा होतो
        महावृक्ष
कुठल्याही वादळाला  न भिणारा ,
न  उन्मळून  पडणारा,
म्हणूनच म्हणतात ,
     पराभव हीच  यशाची
पहिली  पायरी

       मृणाल वाळिंबे

केदार मेहेंदळे

chan kavita.... pan mala watat hi prernadai kavitet post vhayla havi.