गाठोडं

Started by प्रशांत नागरगोजे, May 23, 2012, 08:15:18 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

आयुष्याचा प्रवास वेगळाच
रेखाटलेली वेडीवाकडी वळणं
वळणांवर सजून बसलेले कडू-गोड क्षण
मी घेऊन चालतोय उराशी

आठवणींच्या गाठोड्यात कोंबलेला भूतकाळ
चोपून चोपून बसणारा वर्तमान
दुरूनच गाठोड्याची वाट पाहणारं भविष्य
मी घेऊन चालतोय उराशी

वाटेत कधी घेतलाच विसावा
उघडील गाठोडं जीवनप्रवासाचं
हसवेल-रडवेल, क्षण जे
मी घेऊन चालतोय उराशी

जीवन मरणाच्या सोपवताना हाती
ठेवेल गाठोडं खांद्यावरून खाली
चोपून बसेन होऊन आठवण
मीही कोणाच्यातरी गाठोड्यात 
                                -आशापुत्र

for Quotes-5 visit @ www.prashu-mypoems.blogspot.com

saaarikaaa


केदार मेहेंदळे

khupach chan kavita.... specialy last kadv....

प्रशांत नागरगोजे

धन्यवाद सारिका आणि केदारजी ... :)