अशी असावी ती...........!

Started by Vira, May 23, 2012, 06:21:53 PM

Previous topic - Next topic

Vira

अशी असावी ती...........!



अशी असावी ती,
दीसलोका मी
हलकेच लाजावी ती,
नंतर मग एक मस्‍त
झकास स्‍माईल द्यावी ती.

मित्रानसमोर मला
दुरुनच बघावी ती,
एकांतात मात्र
माझ्या मिठीत निजावी ती.

वारंवार फोन करुन माझी
जेवनाची काळजी तीने घ्‍यावी,
आणि उशीरा का जेवला
म्‍हणून रुसुन बसावी.

गर्दीत तीची नजर
फक्‍त मलाच शोधावी,
आणि मी दीसल्‍यावर
चेह-याचे टेंशन विसरुण माझ्यासंग हींडावी.

कुठे बाहेर गावी गेल्‍यावर
मला तीची फार आठवण यावी,
आणि तीकडून आल्‍यावर
सादा एक फोनही केला नाही
म्‍हणून रागवावी.

माझ्यावर जास्‍तवेळ
तीचा राग नसावा,
Sorry म्‍हटल्‍यानंतर
पुढच्‍याचक्षणी तीचा हात
माझ्या हातात असावा.

मला फक्‍त
तीचीच ओढ असावी,
आणि तीही फक्‍त
माझ्यासाठीच  सजावी.

संकटाच्‍या वेळी
धावून येणारी ती असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.
माझी प्रिये फक्‍त माझीच असावी.

- विरा

Isha Gorivale


swati121