अनामिक नातं

Started by रामचंद्र म. पाटील, May 24, 2012, 11:23:51 AM

Previous topic - Next topic
श्बादांच्या बंधनात अडकलेलं नातं
आज मोकळ्या हवेत खुलत होतं
वार्याच्या प्रवाहात दूरवर दरवळत होत
नकळत एक अनामिक वाट चालत होतं

डोळ्यातला  ओलावा आज कोरडा होता
जग जिंकल्या पेक्षा जास्त आनंद होता
चंचल तिच्या डोळ्यात एकटक पाहत होतो
पहाटेच स्वप्न भर दुपारी सजवत होतो

पुढचा प्रत्येक क्षण  मी  जपत होतो
आठवणीच्या पुस्तकात उमटवत  होतो
तिच्या अस्तित्वाची जाणीव रेखाटत  होतो
तिच्यासवे पुस्तकाला अगदी जीवाशी जपत होतो

गाली खळी पडून तीही गोड  हसली होती
जणू काट्यानसवे गुलाबाची कळी रुतली होती
माझ्या स्वप्नांना ती हि रंगवत होती
नकळत अनाकिम नात्याला नाव देत होती---
--- रामचंद्र म. पाटील

balrambhosle