काही मुक्या भावना

Started by Saee, May 24, 2012, 11:44:00 AM

Previous topic - Next topic

Saee

काही मुक्या भावना,
शब्दांशी खेळताना,
किती अर्थ सांगून गेल्या,
निरर्थक काही बोलताना   

रात्र रात्र जागून मी 
किती स्वप्नं रंगविली 
किती क्षण ते आठवले,
सारे सारे विसरताना   

मी आस तुझ्या साथीची,
कितीदा मनात साठवली 
स्वतःला कितीदा मी थांबवले 
सोडून तुला जात असताना   

इवलेसे विश्व,
ते तुझ्या माझ्या प्रीतीचे
स्मृतिगंध कितीदा दरवळले,
ते घरकुल अपुले घडताना   

मागितलेस जर तू काही 
नाही कशी म्हणेन मी 
तू मात्र मागून गेलास 
विसर सार्या वचनांना   

आज तुला मी ते दिले,
जे स्वातंत्र्य तू मागितले 
किती झाले मी परावलंबी 
तुला स्वातंत्र्य देत असताना   

मी जाईन अशीच निघून सख्या
तोडून अपुले ते नाते,
कट्या वरून चालते मी 
तव पायी गुलाब अंथरताना   




केदार मेहेंदळे