पर्जन्यराजाला आवताण....("निसर्गकविता")

Started by shashaank, May 24, 2012, 12:35:09 PM

Previous topic - Next topic

shashaank

पर्जन्यराजाला आवताण....

काळे कुट्ट नभ माथी
गाती तुझेच पोवाडे
वीजबाई ओवाळिते
कानशिली बोटे मोडे

तुझ्यासाठी उतू गेला
गंध मातीचा आगळा
ढेकूळही सजे वेडे
घेते रंग तो हिरवा

तुझा संग होता राजा
फूल फुलते देखणे
थेंब तुझे मोती होती
कणसात दिमाखाने

तूच राजा परजेना
नको करु रे उशीर
झाली प्रजा उतावीळ
हाक मारते शिवार.....


-shashaank purandare.

   

केदार मेहेंदळे